विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांची दहिवद गावास भेट; विकास कामांचे केले कौतूक

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील दहिवद येथे आज बुधवारी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी धावती भेट दिली. त्यावेळी त्यांच्याहस्ते वृक्षारोपण करण्यात आले. माझी वसुंधरा अभियांतर्गत केलेल्या विकास कामांची पाहणी करून केलेल्या कामांचे कौतूक केले.

गावातील प्रथम नागरिक लोकनियुक्त सरपंच सुषमा पाटील व उपसरपंच बाळू पाटील यांचाहस्ते सत्कार करण्यात आला. यावर्षी लावलेल्या वृक्षलागवड व अटल घनवनची पाहणी केली. कामाचा बाबतीत समाधान व्यक्त करण्यात आले. यावेळी संपूर्ण कामांचा व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत चाललेल्या कामांची माहिती व कामांचा आढावा घेण्यात आला. महसूल विभाग अंतर्गत शेतकऱ्यांना सातबारा वाटप करण्यात आले.

याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी लोखंडे, उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार वाघ, गटविकास अधिकारी एकनाथ चौधरी, तालुका वैद्यकीय अधिकारी गोसावी, विस्तार अधिकारी चिंचारे, विस्तार अधिकारी अनिल राणे, जि.प. बांधकाम अभियंता दिपक बोरसे, पाणी पुरवठा अभियंता नांद्रे, माजी उपसभापती पंचायत समिती सुभाष देसले, दहिवद विकास मंचचे गोकुळ माळी, किशोर पाटील, ग्रामपंचायत सदस्य सुनिल पाटील, शिवाजी पारधी, रवींद्र माळी, वर्षा पाटील, आशा माळी, मालु माळी, वैशाली माळी, ग्रामविकास अधिकारी सोनवणे, तत्कालीन ग्रामविकास अधिकारी संजीव सैंदाणे, तलाठी महेंद्र पाटील, ठाकरे, तांत्रिक अधिकारी धिरज पाटील, बचत गटाचे सीमा रगडे, पाणी फाउंडेशनचे सुनील पाटील यांच्यासह सर्व जिल्ह्यातील प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी, रोजगार सेवक भागवत सोनवणे, कोतवाल प्रदीप देसले, सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील, जयश्री पाटील, गावातील  रोजगार हमी योजनेचे महिला मजूर, व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Protected Content