खामगाव येथे वीज कामगार अभियंते संयुक्त कृती समितीतर्फे द्वारसभा

बुलढाणा प्रतिनिधी । वीज कंपनीने २० वर्षाच्या करारावर दोन खासगी कंपनींना कंत्राट दिल्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. याला वीज कंपन्यात कार्यरत सर्व सघंटनानी तिव्र विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात सोमवारी खामगाव येथे द्वारसभेचे आयोजन करण्यात आले होते.

वीज कंपनीने १ मार्च २०२० पासून टोरांटो व कलकत्ता ईलेक्ट्रिक या खासजी फ्रेन्चाईसी २० वर्षाच्या करार देण्याच्या निर्णयावर महाराष्ट्र राज्य विघुत वितरण कंपनीचे ठाणे व मालेगाव विभाग वीज कंपन्यातील कार्यरत कामगार सघंटनाचा व स्थानिक जनतेचा विरोध करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर त्यास विरोध करण्यासाठी वीज कंपन्यात कार्यरत सर्व सघंटनानी तिव्र विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात विभागीय कार्यालय खामगांव समोर २ मार्च २०२० रोजी सायंकाळी द्वारसभा पार पडली. खामगांव विभागातील सर्व वीज कर्मचारी, अभियंते व अधिकारी यात सहभागी झाले होते. या द्वार सभे चे आयोजन वीज कामगार अभियंते संयुक्त कृती समितीच्या वतीने करण्यात आले होते.

Protected Content