ग.स. निवडणूक प्रचार २४ तास अगोदर थंडावणार

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी – जिल्ह्यातील ग.स. सोसायटीच्या निवडणूक प्रचार तोफा मतदान प्रक्रियेच्या २४ तास अगोदर बुधवार सकाळी थंडावणार आहेत. ग.स. सोसायटी संचालक मंडळ निवडणुक गुरुवार २८ एप्रिल रोजी जिल्ह्यातील १५ केंद्रावर मतदान प्रक्रिया होणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
जिल्ह्यातीलच नव्हे तर राज्यात प्रसिद्ध असलेल्या जळगाव जिल्हा सहकारी नोकरांची सोसायटी संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे. ग.स. सोसायटीची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक २८ एप्रिल रोजी होणार असून २१ संचालक या निवडणुकीद्वारे निवडले जाणार आहेत. या निवडणुकीत ३२ हजार ४४ मतदार सभासद मतदानाचा हक्क बजावणार आहेत. बाहेरील मतदार संघ ५६, इतर मागासवर्ग ६, अनु.जाती-जमाती ६, महिला राखीव १२, वि.जा., भ.ज., वि.मा.प्र. ९ आणि स्थानिक २७ असे एकूण ११६ उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

मतदान केंद्राध्यक्ष मतदान, अधिकारी व कर्मचारी यांचा प्रशिक्षण देखील पार पडले असून निवडणूक प्रक्रिया पारदर्शी व कायदेशीररित्या पार पाडणे बाबतच्या सूचना मतदान अधिकारी कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था वर्ग 1, जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुका सहाय्यक निबंधक कार्यालये, जिल्ह्यातील सर्व तालुका लेखापरीक्षक कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, जळगाव जनता बँक, जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या या आस्थापना वरील अधिकारी-कर्मचाऱ्यांची मतदान प्रक्रियेसाठी मतदान अधिकारी व कर्मचारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

संतोष बिडवई,
निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था,जळगाव

Protected Content