जामनेरात मुलाने आईच्या वाढदिवसानिमित्त वाटप केले धार्मिक ग्रंथ

जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील स्व. मनुबाई विठ्ठल महाजन कन्या माध्यमिक विद्यालयाचे कर्मचारी संजीव चौधरी यांनी त्यांची आई यमुनाबाई चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त ७० विद्यार्थ्यांना धार्मिक ग्रंथ व पेन वाटप केले व अन्नदान केले.

त्यांच्या या सेवाभावी कार्याचे गुर्जर समाजात कौतुक होत आहे . ८७ व्या वृद्ध रेवे गुर्जर समाजातील आदर्श असा आईला वाढदिवस साजरा झाला . यावेळी नगराध्यक्षा साधनाताई महाजन, गटनेते डॉ. प्रशांत भोंडे नगरसेवक जयेश पाटील, सुहास पाटील, भाजपाने ज्येष्ठ नेते श्रीराम महाजन , ललवाणी शैक्षणिक संकुलाले सचिव किशोर महाजन , कन्या हायस्कूल चे  माजी अध्यक्ष एकनाथ देशमुख, उपाध्यक्ष रणजीत  महाजन , सचिव दिलीप महाजन , सहसचिव सुधाकर पाटील , प्रवीण जहागीरदार , दत्तात्रय सुरळकर आदि उपस्थित होते. अध्यक्ष यांचा हस्ते दीप प्रज्वलन करून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांना भागवत नवनीत या ग्रंथाचे वाटप करण्यात आले .

 

Protected Content