अमळनेर मार्गाने जाणाऱ्या रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर मार्गाने जाणारी एक्स्प्रेस व पॅसेंजर गाडी तातडीने सुरु करण्यात यावी, अशी मागणी येथील एआयएमआयएमच्या वतीने रेल्वे स्टेशन मास्तर तसेच पश्चिम रेल्वेचे जीएम आलोक कन्सल व जळगाव खासदार उन्मेष पाटील यांना करण्यात आली असून यासंदर्भातील लेखी निवेदन देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अमळनेर रेल्वे स्टेशन वरून जाणारी सर्व एक्स्प्रेस व पॅसेंजर गाड्या तातडीने सुरू करावे तसेच संपूर्ण एक्स्प्रेस गाड्यांची लोकल टिकट सेवा देखील सुरू करण्यात यावे. अमळनेर हुन सकाळी सात वाजता भुसावळ कडे जाणारी सुरत भुसावळ पॅसेंजर गाडी तात्काळ सुरू करण्यात यावी, कारण या गाडीने अमळनेर ते जळगाव दररोज हजारो लोक अप डाउन करतात.

तसेच  09078 भुसावळ नंदूरबार पॅसेंजर ही गाडी सुरत प्रयत्न करावी, अमरावती एक्स्प्रेस ही गाडी दररोज करण्यात यावी, विशेष म्हणजे पॅसेंजर गाडीचे टिकट दर आजही एक्स्प्रेसच्या नुसार घेतले जाते. सदरील टिकीटाचे दर तात्काळ कमी करावे, आणि संपूर्ण एक्स्प्रेस गाड्यांची लोकल टिकट सेवा ही सुरू करावी. अशी मागणी एआयएमआयएमचे तालुकाध्यक्ष अजहर शेखज, शहराध्यक्ष हाजी सईद शेख, कलीम शेख हाजी जलालोदीन, हसन शाह, असलम शाह उपस्थित होते.

 

 

 

Protected Content