Home धर्म-समाज यावल येथे ‘पैरहन ए शरीफ’ची मिरवणूक उत्साहात (व्हिडीओ)

यावल येथे ‘पैरहन ए शरीफ’ची मिरवणूक उत्साहात (व्हिडीओ)

0
32

pairahan e sharif

यावल, प्रतिनिधी | येथील संपुर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या ‘जश्ने पैरहन ए शरीफ’च्या ढोलीची मिरवणुक अत्यंत उल्हासाच्या व शांततेच्या वातावरणात संपन्न झाली, सालाबादप्रमाणे फिरत्या पद्धतीने काढण्यात येणारी सय्यद गौसे आजम दरतगीर यांचे पवित्र वस्त्र असलेल्या ढोलीची ‘जश्ने पैरहन ए शरीफ’ची मिरवणुक हे यावर्षी बाबुजीपुरा पंच कमेटीच्या वतीने काढण्यात आली.

येथील सालाबादप्रमाणे साजरे करण्यात येणारे ‘जश्ने पैरहन ए शरीफ’ची भव्य अशी मिरवणुक ढोल ताशे झांजच्या गजरात आज दुपारी ४.०० वाजेपासुन डांगपुरा येथील परिसरातुन त्यांचे खादीम यांच्या निवासस्थानाहुन काढण्यात आली. संपुर्ण महाराष्ट्रसह मध्यप्रदेश, गुजरात या राज्यातुन मोठया प्रमाणात मुस्लीम बांधव या ‘पैरहन ए शरीफ’ ढोलीच्या दर्शनासाठी येतात, यंदाची पैरहन शरीफची ढोली मिरवणुकही बाबुजीपुरा मोहल्ल्याच्या वतीने काढण्यात आली, यासाठी पैरहन शरीफ कमेटीचे अध्यक्ष मोहम्मद हकीम मोहम्मद याकुब, उपाध्यक्ष युसुफखान ईस्माईल खान, एजाज कादर पिंजारी , कोषाध्यक्ष अय्युब खान फजुल रहेमानखान, सचिव युनुस खान युसुफ खान, कार्याध्यक्ष निजामोदीन शेख कमरोद्दीन, शेख असलम शेख लाल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पंच कमेटी यांनी पैरहन शरीफ मिरवणुक यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. यावेळी विभागीय पोलीस अधिकारी नरेन्द्र पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक रविकांत सोनवणे, पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार, पोलीस उपनिरिक्षक सुनिता कोळपकर व सर्व पोलीस कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. उद्या (दि.१५) पैरहन शरीफ निमित्ताने राज्य पातळीवरील मल्लांची कुस्ती दंगल सायंकाळी ४.०० वाजता ठेवण्यात आली आहे.

 

 

 


Protected Content

Play sound