लादेनचा मुलगा हमजाला अमेरिकेने केले ठार

17017 binladens 600 384

न्यूयॉर्क, वृत्तसंस्था | ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेन अमेरिकेने केलेल्या कारवाईत ठार झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज या वृत्तास दुजोरा दिला. अमेरिकेने हाती घेतलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत हमजा बिन लादेनला ठार मारण्यात आल्याचे ट्रम्प यांनी स्पष्ट केल्याचे वृत्त आहे.

 

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमाभागात अमेरिकेने दहशतवादाविरुद्ध जोरदार मोहीम हाती घेतली आहे. याच कारवाईत हमजाचा खात्मा करण्यात आल्याचे व्हाइट हाऊसने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. ओसामा बिन लादेनचा खात्मा झाल्यानंतर ‘अल-कायदा’ची सूत्रे हमजाच्या हाती आली होती. हमजाचा खात्मा झाल्याने दहशतवादविरोधी कारवाईला मिळालेले हे मोठे यश मानले जात आहे. दरम्यान, हमजाला नेमके कधी ठार करण्यात आले, हे मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही.

Protected Content