खेडी येथे जुन्या वादातून तरूणावर चाकूहल्ला; तीन जणांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील खेडी बुद्रुक येथील २३ वर्षीय तरुणाला जुन्या वादातून तीन जणांनी बेदम मारहाण करून चाकूने प्राणघातक हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी १६ डिसेंबर रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडला. याप्रकरणी शुक्रवारी १७ डिसेंबर रोजी सकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की, धनराज गजानन कोळी (वय-२३) रा. हुडको खेडी बुद्रुक ता. जि. जळगाव हा खाजगी वाहन चालवून आपला कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतो. गुरुवार १६ डिसेंबर रोजी रात्री धनराज कोळी हा परभणी येथून गाडी खाली करून रात्री ११ वाजता जळगावात आला. त्यानंतर खेडी बुद्रुक येथे  वाहन त्याच्या घराच्या बाजूला लावून घराकडे जात होता. त्यावेळी जुन्या वादातून भावेश पोपट पाटील, संदीप पोपट पाटील आणि शिवाजी पाटील सर्व रा. खेडी बुद्रुक ता. जि. जळगाव यांनी जुन्या वादाचा रागातून धनराज कोळी याला शिवीगाळ करू लागले. याचा जाब विचारल्याचा राग आल्याने तिघांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यातील भावेश पाटील याने चाकू काढून धनराजच्या डाव्या हाताच्या दंडावर व पोटाच्या एका बाजूला चाकूने वार करून जखमी केले. यात धनराज जखमी झाला. त्याला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

 

याप्रकरणी धनराज कोळी यांच्या फिर्यादीवरून शुक्रवार  १७ डिसेंबर रोजी सकाळी संशयित आरोपी भावेश पोपट पाटील, संदीप पोपट पाटील आणि शिवाजी पाटील या तिघांविरोधात  एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ योगेश सपकाळे करीत आहे.

Protected Content