धक्कादायक : प्रेयसीने कोयत्याने गळा कापून केला प्रियकराचा खून !

सांगली (वृत्तसंस्था) प्रेयसीने कोयत्याने गळा कापून प्रियकराचा खून करून स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाल्याची घटना आज सांगली जिल्ह्यात घडली आहे. या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

महंतेश बिरादार (27 वर्षे) मूळ रा. संख, ता.जत, जि.सांगली असे हत्या करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे. तर अनुराधा करे ( वय 24 वर्षे) सध्या रा. नऱ्हे, मूळ गाव करेवाडी, जि.सांगली असे खून करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. अनेक प्रकरणांमध्ये लग्नास नकार दिल्यावर प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याचे आपण ऐकले आहे. परंतू या घटनेत चक्क प्रेयसीने कोयत्याने गळा कापून प्रियकराचा खून केल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Protected Content