चोपडा येथील विवेकानंद विद्यालयात मराठी शुभेच्छा पत्रांचे प्रदर्शन उत्साहात

 

चोपडा प्रतिनिधी । येथील विवेकानंद विद्यालयात इयत्ता पाचवी ते आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी कला विषयांतर्गत तयार केलेल्या मराठी शुभेच्छा पत्राचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.

कलाशिक्षक राकेश राजकुमार विसपुते यांच्या मार्गदर्शनाने व मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांच्या प्रेरणेने तसेच चोपडा येथील ललित कला महाविद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र महाजन , जळगाव कलाध्यापक संघाचे उपाध्यक्ष व महात्मा गांधी विद्यालयाचे उपशिक्षक दिनेश बाविस्कर, चोपडा कला अध्यापक संघाचे अध्यक्ष व गोरगावले हायस्कूलचे कलाशिक्षक सुनील पाटील यांच्याहस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी कलेविषयी आपले मनोगत व्यक्त केले.

प्रदर्शनास विद्यालयातील सर्व विभागातील विद्यार्थ्यांन सोबत शिक्षकवृंद, कर्मचारीवृंद,अनेक कला प्रेमींनी हजेरी लावत कलाकृतीचा आनंद घेतला. त्यामुळे त्यांच्या कल्पकतेत भर पडली. या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय पोतदार, संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनशाम अग्रवाल, सचिव अॅड. रवींद्र जैन, विश्वस्त सुधाकर केंगे, मंगला जोशी, मुख्याध्यापक नरेंद्र भावे, मुख्याध्यापिका वासंती नागोरे यांच्यासह सर्व विश्वस्तमंडळ, पदाधिकारी यांनी अभिनंदन व कौतुक केले.

Protected Content