गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात कारगिल विजय दिनानिमित्त विविध कार्यक्रम

p v patil vidyalay 1

जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात कारगिल विजय दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम शाळेच्या मुख्यापिका रेखा पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांच्यातर्फे कारगिल युद्धात शाहिद झालेल्या जवानांना मानवंदना देण्यात आली.

कलाशिक्षक योगेश सुने यांनी ‘ए मेरे वतन के लोगो’ या गीताने शहिदांच्या कामगिरीची महती पटवून दिली तर मुख्यापिका रेखा पाटील तसेच नेमीचंद झोपे यांनी कारगिल विजय दिनाबद्दल माहिती सांगितली तसेच उपशिक्षक योगेश भालेराव यांनी इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांना कारगिल युद्धाचे प्रत्यक्ष चित्रीकरण दाखवून विजय दिनाची ओळख करून दिली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपशिक्षक नेमीचंद झोपे, योगेश भालेराव, स्वाती पाटील, अशोक चौधरी आदींनी परिश्रम घेतले.

Protected Content