मृतावस्थेतील बचत गट तात्काळ सुरू करा : शिवसेनेची विजया रहाटकर यांच्याकडे मागणी

 

मुक्ताईनगर, प्रतिनिधी | शहरातील बचत गट ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर झाल्याने प्रशासक काळाचे आठ महिने व सत्तेचे कार्यकारी मंडळ विराजमान झाल्यानंतरचे एक वर्ष असे दोन वर्षांचा कालावधी लोटला तरी मृतावस्थेत गेले असून या मृतावस्थेतील बचत गट तात्काळ सुरू करण्यासंदर्भात शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक सुषमा बोदडे -शिरसाठ यांनी यांनी मागणी केली आहे.

मुख्याधिकारी यांनी शासनाकडे कोणताही पाठपुरावा बचत गट सुरू करण्यासंदर्भात केलेला नाही. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.निवेदन देतेवेळी महिला आघाडी शहर संघटक सरिता कोळी, नगरसेविका सविता भलभले, यशोदा माळी , उज्वला कुंभार , शारदा भोई, अनिता मराठे, ज्योती मालचे, सुनीता मोरे , प्रतिभा बाविस्कर यांच्यासह शहरातील असंख्य बचत गटांच्या महिला उपस्थित होत्या. शिवसेनेचे नगरसेवक संतोष मराठे यांनी दि.३० जानेवारी रोजी नगराध्यक्षा नजमा तडवी व मुख्याधिकारी शाम गोसावी यांना पत्र देत मुक्ताईनगर येथे बचत गट यांच्यासाठी तात्काळ स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात यावा अशी मागणी केली होती. शहरी भागातील बचत गटास NURLM अंतर्गत आयुक्त तथा संचालक महानगर पालिका यांच्या सुवर्ण जयंती शहरी रोजगार योजनेत उपायुक्त महानगरपालिका व मुख्याधिकारी नगरपालिका यांच्याकडून स्वयंरोजगारासाठी प्रत्येक गटास ५०% अनुदान व ५०% कर्जरुपाने मिळतात त्यामुळे आपले नगरपंचायतीने तात्काळ स्वतंत्र कक्ष स्थापन करून बचत गट असलेल्या महिला, पुरुषांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली.

Protected Content