गजेंद्र सोनवणे यांनी केली पायदळ गावी जाणार्‍या मजुरांच्या भोजनाची केली व्यवस्था

चोपडा प्रतिनिधी । लॉकडाऊन सुरू असतांना आपल्या गावाकडे पायपीट करून परत जाणार्‍या मजुरांना हातेड बुद्रुक येथे जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र सोनवणे यांनी भोजनाची व्यवस्था करून दिली.

कोरोना सारख्या वैश्‍विक महामारीमुळे समाजजीवन पुर्णपणे ढवळून निघाले आहे. यात स्वगृही परतण्यासाठी मजुरांचे अतोनात हाल होत आहे. यावेळी मध्यप्रदेशातील खंडवा येथील मजुर पायपीट करत आपल्या स्वगृही जात असतांना चोपडा तालुक्यातील हातेड बुद्रुक येथे या मजुरांची जेवणाची व्यवस्था जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र पांडुरंग सोनवणे यांनी करून दिली. यावेळी ग्रामसेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष नंदकिशोर सोनवणे, जितेंद्र सुर्वे ,नितीन शिरसाठ, प्रभाकर सनेर , भैय्या शिरसाठ, राकेश सोनवणे , प्रभाकर सोनवणे ,नवल सोनवणे , केदारनाथ पाटील,रविंद्र निळकंठराव सोनवणे, मनोज शिरसाठ, शिवाजी सनेर, सुनील बाविस्कर ,मंदार बाविस्कर, जितेंद्र सनेर, प्रवीण पाटील आदींनी सहकार्य केले.

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News

युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH

इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content