जुन्या भांडणाच्या कारणावरून काका पुतण्याला बेदम मारहाण

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील रामदेवबाबा नगरात जुन्या भांडणाच्या कारणावरून काका पुतण्याला तलवारी व लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण करून दुखापत केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, धरणगाव शहरातील रामदेवबाबा नगरात सागर अनिल पाचेरवार हा तरूण आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी २२ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून सागर पाचेरवार आणि त्याचा काका प्रकाश तुकडू पाचेरवार यांना परिसरात राहणारे सुकदेव गोकुळ पाचेरवार, अर्जून पाचेरवार , प्रेम पाचेरवार, पवन पाचेरवार,अक्षय पाचेरवार, संजय पाचेरवार, सुधिर पाचेरवार, यश पाचेरवार, पृथ्वी पाचेरवार, एकनाथ वाघरे आणि चेतन वाघरे सर्व रा.रामदेवबाबा नगर धरणगाव यांनी हातात तलवार आणि लाठ्याकाठ्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच दमदाटी केली. यात सागर पाचेरवार आणि त्याचा काका प्रकाश पाचेरवार हे दोघे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी सोमवारी २३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता अजय पाचेरवार याने दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content