जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतला महसुल व नगर पालिकेच्या कार्याचा आढावा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावल येथे भेट देत येथील महसूल विभाग नगरपालिकासह इतर शासकीय कार्यालयाचा आढावा घेतला. बैठकीत जिल्हाधिकारी यांनी आगामी लोकसभा निवडणूकी सह नियमित कार्यालयीन कामकाजाच्या संदर्भात महत्वाच्या सुचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीस यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, यावल पंचायत समिती गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड उपस्थित होत्या.

शासकीय आढावा बैठकी नंतर जिल्हाधिकारी आयुष्य प्रसाद यांनी नगर पालिकेच्या दालनात झालेल्या बैठकीत पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, तालुक्यातील दुर्गम भागातील मतदान केन्द्र, वाहन व्यवस्था, मतदारांची नावे मतदारांनी खात्री करुन घेणे बाबत त्यांनी माहिती दिली. या पत्रकार परिषद मध्ये जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी महसूल वसुली बाबत येथील तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी कार्यालयाच वसुली बाबत तसेच गौण खनिज चोरीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवले असल्याचे त्यांनी सांगितले. पिकपाहणी सध्या शेतकरी स्वत:करीत असल्याने विमा बाबत भविष्यात अडचणी येणार नाहीत असे ही सांगितले.

यावल नगरपालिकेच्या कर वसुली बाबत जिल्हाधिकारी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यावल नगर पालिकेची वसुली केवळ ११ टक्केच झाली असल्याचे नगरपालिका प्रशासनाकडून माहिती मिळाल्याने जिल्हाधिकारी यांनी नगरपालिकेच्या प्रशासनाला वसुली संदर्भात सक्त सुचना दिल्याचे सांगून कर वसुली संदर्भात प्रसंगी दंडात्मक कारवाई करण्याच्या सुचना दिल्या आहेत. पालिकेचे उत्पनाचे मुख्य स्त्रोत करवसुली असल्याचे सांगून करवसुली झाली तरच शहराचा विकास होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. नगरपालिकेच्या स्वच्छता अभियानाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. यावल शहरातील सुरू असलेल्या १५ विकासात्मक कामा पैकी १० कामे ही पुर्ण झाली आहे तर उर्वरीत ५ कामे प्रगतीपथावर असल्याचे सांगितले व इतर प्रशासकीय कार्याबाबत ही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद समाधान व्यक्त केले.

Protected Content