आरोग्य केंद्रात लसीकरणास सुरुवात

यावल प्रतिनिधी । कोरोनाचा ग्रामीण क्षेत्रात वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. यंत्रणा अधिक सर्तक व सज्ज झाले असुन जिल्ह्यासह यावल तालुक्यात आज लस उपलब्ध झाल्याने पुन्हा कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात झालेली आहे. 

दरम्यानच्या काळात काही लसीकरण केंद्रावर लस उपलब्ध नसल्याने लसीकरण बंद करण्यात आले होते त्यामुळे अनेक नागरीकांची मोठी गैरसोय निर्माण झाली होती परंतु आज यावल तालुक्यात लस उपलब्ध झाल्याने तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रांवर आज लसीकरण सुरू करण्यात आलेले आहे. तालुक्यातील फक्त ग्रामीण रुग्णालय यावल व भालोद प्राथमिक आरोग्य केंद्र या  दोन ठिकाणी १८ वर्ष ते ४४ वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. या केंद्रावर ज्यांनी रजिस्टेशन करून केंद्राची निवड झालेली आहे अशा व्यक्तिंनचेच या ठिकाणी लसीकरण केले जात आहे. तर तालुक्यातील इतर सर्व लसीकरण  (आरोग्य) केंद्रांवर ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. 

प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडासिम  येथे ४५ वर्षा वरील  कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण वैद्यकीय अधिकारी डॉ. नसीमा तडवी व डॉ. गौरव भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

लसीकरणाचा दुसरा (सेकंड) डोस असलेल्या नागरिकांना प्राधान्य देण्यात आले. तर ३०टक्के लसीकरण हे प्रथम डोस असणाऱ्या नागरिकांचे करण्यात आले. असे वैद्यकीय अधिकारी डॉ. नसीमा तडवी व डॉ. गौरव भोईटे यांनी सांगितले.सावखेडासिम व तालुक्यातील विविध आरोग्य केंद्रांवर आजपासुन कोरोना लसीकरण कार्यक्रमास सुरुवात झाली आहे.

Protected Content