यावल प्रतिनिधी । तालुक्यातील थोरगव्हाण येथील तरूणाच्या आत्महत्या प्रकरणाला कलाटणी मिळाली असून त्याने आपल्या पत्नीच्या अनैतिक संबंधांना कंटाळून आपली जीवनयात्रा संपविल्याची माहिती सुसाईड नोटमधून समोर आल्याने तिघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात मिळालेली माहीती अशी की भानुदास मंगल चौधरी (राहणार थोरगव्हाण) या तरूणाने दिनांक २ मे रोजी आपल्या शेतातील बांधावर असलेल्या निंबाच्या झाडास गळफास घेवुन आत्महत्या केली होती. यात मयत भानुदास चौधरी याच्या खिशातुन सुसाईड नोट मिळाली होती. या सुसाईड नोटचा आधार घेवुन पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या आदेशाने पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार यांनी चौकशीची दिशा तात्काळ व योग्य दिशेने केल्याने अखेर या आत्महत्याच्या कारणांचा शोध लागला आहे.
दरम्यान मयताच्या पत्नीशी संशयीत आरोपी संजय तुषार देशमुख (राहणार तारामती नगर चोपडा) हिच्याशी अनैतिक संबंध होते व यास पतीस सोडुन जाण्यास संशयीत महीला व तिचा पती मदत करीत असल्याचे निर्देशनास आल्याने मयतास मनस्ताप झाल्याने अखेर त्यांने आपली जिवनयात्रा संपवली अशी माहिती समोर आली.
या संदर्भात योगराज रामकृष्ण चौधरी (राहणार थोरगव्हाण) यांनी फिर्याद दिल्याने मयत भानुदास चौधरीच्या आत्महत्यास प्रवृत्त करण्यास कारणीभुत ठरल्याच्या कारणावरून तुषार संजय देशमुख व त्याची पत्नी आणि मयताची पत्नी यांच्या विरूद्ध भाग५ गु .र .न .७७ भादवी कलम३०६, ३४प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.