यावल तालुका हगणदरीमुक्त होण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे जनजागृती

pahur1

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील दहिगाव हे गाव हगणदारीमुक्त झालेले असल्याचे शासनाने जाहीर केल्यानुसार गावात प्रत्येक नागरिकांनी आपले गाव हगणदारीमुक्तच राहावे म्हणून सहकार्य करावे, अन्यथा शासकीय पातळीवर कार्यवाही करण्यात येईल. असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक अरुण धनावडे यांनी हा उपक्रम तालुक्यात सुरू केलेला आहे तालुक्यात अनेक गावांना हगणदारी मुक्ती चे फलक लागलेले आहेत मात्र त्या गावात हागणदारीमुक्त दिसून येत नसल्याने त्यांनी पोलीस पाटलांच्या माध्यमातून गाव हागणदारी मुक्त राहायला पाहिजे हा उपक्रम सुरू केलेला आहे गावात दवंडी देऊन नागरिकांमध्ये स्वच्छेते संदर्भात जनजागृती करून नागरीकांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या मागचा उद्देश असुन, त्यानुसार दहीगावात येथे देखील पोलीस पाटील संतोष पाटील यांनी दवंडी पिटून ग्रामस्थांमध्ये स्वच्छतेबाबत व हगणदारीमुक्ती बाबतजागृती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. ज्यांच्याकडे शौचालय आहे अशांनी शौचालयाचा वापर करावा आणी ज्यांच्याकडे शौचालय नाहीत अशांनी सार्वजनीक शौचालयाचा उपयोग करावा जेणे करून आपल्या गावात स्वच्छता राखावी आणि गाव शासनाच्या ठरल्याप्रमाणे हागणदारी मुक्त ठेवावे जे लोक उघड्यावर शौचास बसतील अशांवर योग्य कार्यवाही करण्यात येईल असे निर्देश देण्यात आले आहे.

Protected Content