Home राजकीय केजरीवाल सरकारचा १६ फेब्रवारीला रामलीला मैदानात शपथविधी

केजरीवाल सरकारचा १६ फेब्रवारीला रामलीला मैदानात शपथविधी

0
48


EQf1ODHU8AAJqN5
 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाची धूळ चारल्यानंतर ‘आम आदमी पक्षा’चे अध्यक्ष अरविंद केजरीवाल सलग तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. हा शपथविधी सोहळा रविवार, १६ फेब्रवारी रोजी रामलीला मैदानात होणार आहे.

दिल्लीकरांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपा व काँग्रेसला सपशेल नाकारत आम आदमी पार्टीच्या बाजूने कौल दिला आहे. विधानसभेच्या ७० जागांपैकी ‘आप’ने ६२ जागांवर विजय मिळवला. आता अरविंद केजरीवाल हे तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, यावेळी केजरीवाल यांचा मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीचा मुहूर्त दोन दिवस पुढे गेला आहे. ‘व्हेलेंटाईन डे’ च्या दिवशी शपथ घेणारे केजरीवाल यावेळी रविवार, १६ फेब्रवारी रोजी रामलीला मैदानात दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत.


Protected Content

Play sound