राज्यस्तरीय पर्यावरण साहित्य संमेलनाच्या विविध स्पर्धेत विवेकानंद विद्यालयाचे यश

chopda2

चोपडा प्रतिनिधी । वसुंधरा महोत्सव २०२० अंतर्गत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुरस्कृत राज्यस्तरीय पर्यावरण साहित्य संमेलनात काव्यवाचन, कथाकथन, परिसंवाद, पथनाट्य या विविध स्पर्धेत विवेकानंद विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

विद्यालयाची आस्था दिपक साळुंखे ही कथाकथन स्पर्धेत तृतीय पारितोषिक तर विद्यालयाच्या पथनाट्याला उत्तेजनार्थ पारितोषिक प्राप्त झाले. बक्षीस प्राप्त विद्यार्थ्यांना विद्यालयाचे उपशिक्षक, पक्षीमित्र हेमराज पाटील, उपशिक्षक अनिल शिंपी व कलाशिक्षक राकेश विसपुते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सहभागी विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे कथाकथन- सत्यम सोनवणे, जयेश पाटील, निल केंगे कवितावाचन – प्रतीक्षा पाटील परिसंवाद – जयेश पाटील पथनाट्य – तेजस्विनी पाटील, कोमल सुराणा, मोहिनी पाटील, हर्षदा महाजन, मयुरी बागुल, आदित्य पाटील, श्रीराज पाटील, स्वरूप दाभाडे असे होत. या सर्व विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे अध्यक्ष डॉ.विजय पोतदार, संस्थापक अध्यक्ष डॉ.विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव अॅड.रवींद्र जैन, मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांच्यासह विश्वस्त मंडळ, शिक्षकवृंद, पालकवृंद व विद्यार्थ्यांनी केले.

Protected Content