पाचोरा-भडगाव तालुक्यातील गुणवंतांचा सत्कार

 

Prizes Honors copy 11 222

पाचोरा प्रतिनिधी । 19 जुन रोजी शिवसेना पक्षाचे वर्धापन दिनाचे व 13 जुन युवासेना पक्षप्रमुख आदित्य ठाकरे यांचे वाढदिवसाचे औचित्य साधुन येत्या 16 जुन रविवार रोजी ठीक सकाळी 9 वाजता राजीव गांधी टाऊन हॉल येथे तालुक्यातील गुणवंतांचा सत्कार  होणार आहे.

याठिकाणी, पाचोरा-भडगाव तालुक्यातील सर्व 10 वी व 12वी तसेच इतर शाखेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यसम्राट आ. किशोर पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.  त्याचसोबत उत्तीर्ण झालेले सर्व विद्यार्थ्यासाठी विविध तज्ज्ञ मंडळी यजुर्वेद महाजन दीपस्तंभ संचालक व राजेंद्र चिंचोले करीअर मार्गदर्शक पाचोरा, राजेंद्र कचरे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार कैलास चावडे यांच्या करीअर मार्गदर्शन लाभणार आहे.

Add Comment

Protected Content