कठुआतील तिघांना जन्मठेप तर तिघांना सक्तमजुरी

पठाणकोट वृत्तसंस्था । संपूर्ण देशाला हादरवून सोडणार्‍या कठुआ येथील बलात्कार व हत्येप्रकरणी तीन आरोपींना जन्मठेप तर तिघांचा सक्तमजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

गेल्या वर्षी १० जानेवारी रोजी मुलीचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर तिच्यावर बलात्कार आणि नंतर तिचा खून करण्यात आला आल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी आरोपींमध्ये राम, त्याचा मुलगा विशाल, पोलीस उपनिरीक्षक आनंद दत्ता, दोन विशेष पोलीस अधिकारी दीपक खजुरिया आणि सुरेंद्र वर्मा, हेट कॉन्स्टेबल तिलक राज आणि स्थानिक नागरिक परवेश कुमार यांच्याविरुद्ध बलात्कार, खून आणि पुरावे मिटवण्याच्या कृत्यांच्या आधारावर अनेक कलम लावण्यात आली होती. या प्रकरणी आज सकाळीच न्यायालयाने सात पैकी सहा आरोपींना दोषी ठरवले. त्यानुसार मुख्य आरोपी सांजी राम, दीपक खजुरिया, सुरेंदर वर्मा, तिलक राज, आनंद दत्ता, परवेश कुमार या सहा जणांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. तर सांजी रामचा मुलगा विशाल याला न्यायालयाने दोषमुक्त केले.

तर दुपारून न्यायालयाने या प्रकरणी शिक्षा सुनावली. विशेष न्यायालयाने सहापैकी तिघांना बलात्कार आणि हत्येप्रकरणी दोषी ठरवले. अन्य तिघांना पुरावे नष्ट करण्याच्या आरोपांत दोषी ठरवले. सांझी राम, परवेश कुमार, दीपक खजुरिया यांना ३०२ (हत्या), ३७६ (बलात्कार), १२० ब (कट रचणे), ३६३ (अपहरण) या कलमांतर्गत दोषी ठरवण्यात आले. पोलीस कर्मचारी आनंद दत्ता, सुरेंद्र कुमार, तिलक राज यांना २०१ (पुरावे नष्ट करणे) या कलमांतर्गत शिक्षा ठोठावण्यात आली.

Add Comment

Protected Content