मुंबई पोलिसांवर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे

नवी दिल्ली वृत्तसंस्था । बिहारच्या पोलीस अधिकार्‍यांना क्वारंटाईन केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने आज मुंबई पोलिसांवर ताशेरे ओढले आहेत.

अभिनेता रिया चक्रवर्ती हिने एफआयआर पाटणा पोलिसांकडून मुंबई पोलिसांकडे हस्तांतरित करण्याच्या याचिकेवर सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने असे मुंबई पोलिसांना खडेबोल सुनावले आहेत.

सुशांत मृत्यूच्या चौकशीचे नेतृत्व करण्यासाठी मुंबईला पाठविलेल्या पाटणा पोलिस अधिकारी विनय तिवारी यांना जबरदस्तीने अलग ठेवण्याचे आरोप मुंबई पोलिसांवर करण्यात आले आहेत. सुनावणीदरम्यान, केंद्राने सुप्रीम कोर्टात सांगितले की, अभिनेता सुशांतच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची बिहार सरकारने केलेली शिफारस त्यांनी मान्य केली आहे. केंद्र सरकारने बिहार सरकारची मागणी मान्य केली आहे. सुशांत मृत्यू प्रकरणाची उइख चौकशी केली जाईल, अशी माहिती केंद्र सरकारचे महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात दिली.

Protected Content