संगीतकार श्रवण राठोड यांचे निधन

 

मुंबई : वृत्तसंस्था । नव्वदच्या दशकात आपल्या सुमधूर संगीताने एका पिढीला प्रभावित करणाऱ्या संगीतकार नदीम-श्रवण जोडगोळीतील संगीतकार श्रवण राठोड यांचे गुरुवारी रात्री कोरोनाने निधन झाले. ते ६६ वर्षांचे होते.

 

श्रवण यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. कोरोनावरील उपचारासाठी त्यांना माहीम येथील एल. एस. रहेजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.

 

श्रवण यांना मधुमेहाचा त्रास होता. कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या फुफ्फुसांनाही संसर्ग झाला होता. १९९० साली प्रदर्शित झालेल्या ‘आशिकी’ चित्रपटातील संगीताने नदीम-श्रवण यांना हिंदी चित्रपटसृष्टीत लोकप्रियता मिळवून दिली. प्रसिद्ध गायक कुमार सानू, उदित नारायण आणि अलका याज्ञिक या तिघांचा आवाज आणि नदीम-श्रवण यांचे संगीत हे समीकरण कमालीचे लोकप्रिय ठरले होते.

Protected Content