चोपडा महाविद्यालयातर्फे हिंगणघाट व सिल्लोड अत्याचाराचा निषेध

chopda1 1

चोपडा प्रतिनिधी । येथील महाविद्यालयातील महिला तक्रार निवारण समितीतर्फे हिंगणघाट येथील प्राध्यापिकेला पेट्रोल टाकून जीवंत जाळणाऱ्या नराधमास तसेच औरंगाबाद सिल्लोड येथील महिलेच्या घरात घुसून रॉकेल टाकून जाळणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा व्हावी यासाठी तहसील आणि पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

यावेळी निवेदन देतांना महिला तक्रार निवारण समिती प्रमुख माया टी.शिंदे म्हणाल्या की, सदरची घटना ही अतिशय भयानक, अमनावीय अमानुष व क्रूर स्वरुपाची असून या घटनेमुळे समाजात अंसंतोष निर्माण होत आहे. अशा घटनेमुळे भारतात स्रिया, मुली असुरक्षित असल्याचे निष्पन्न होत आहे तसेच या घटनेमुळे सामान्यजनांचे मन उद्विग्न होत आहे. समाजातील अशा अपप्रवृतीना आळा घालण्यासाठी या घटनेतील आरोपींना तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी हीच खरी श्रद्धांजली ठरेल. याप्रसंगी उपप्राचार्य एन.एस.कोल्हे, ऑक्सफर्ड इंग्लिश मिडीयम स्कूलच्या प्राचार्या रेखा पाटील, डॉ.आर.आर.पाटील तसेच संगीता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी महाविद्यालयातील बहुसंख्य प्राध्यापक बंधू-भगिनी व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content