दहावी-बारावी निकाल लांबण्याची शक्यता !; जाणून घ्या ‘या’ मागचे कारण

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस वृत्तसेवा । जुन्या पेन्शन योजनेसाठी राज्य सरकारी कर्मचारी यांनी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. या लग्नामुळे अनेक शासकीय कामांवर परिणाम झाला आहे. यात एकीकडे रूग्णालयात रूग्ण व नातेवाईकांचे हाल होत आहे तर दुसरीकडे दहावी व बारावीच्या निकाल लांबण्याची शक्यता आहे. अशी माहिती शालांत परिक्षा बोर्डाच्या सुत्रांनी दिली आहे.

 

नेमके हे आहे कारण !

गेल्या काही चार दिवसांपासून राज्य कर्मचारी आपल्याला जुन्या पेन्शन योजनेसाठी बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे दहावी व बारावी परिक्षानंतर उत्तरपत्रिका तपासणीचे काम रखडले आहे आहे.दहावी व बारावी परिक्षेच्या ७५ लाख उत्तरपत्रिका  तपासणीविना पडून राहण्याची शक्यता आहे.   सद्यस्थितीत आजचा पेपर झाल्यानंतर 30 लाख उत्तर पत्रिका तपासणी विना पडून राहतील. त्यामुळे निकाल आठवडाभराहून अधिक लांबण्याची शक्यता आहे, अशी माहिती बोर्डाच्या सूत्रांनी दिली आहे.

 

बेमुदत संपामुळे बोर्डाच्या उत्तरपत्रिका तपासणी विना पडून

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शिक्षक संघटनांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. त्यामुळे आता दहावी आणि बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर संकटाचे काळे ढग जमा झाले आहेत. या संप काळात उत्तरपत्रिका न तपासण्याचा शिक्षक संघटनांनी पवित्रा घेतला आहे. बारावी बोर्डाचे परीक्षा संपत आल्या आहेत. तर दहावी बोर्ड परीक्षेचे आणखी तीन पेपर बाकी आहेत. आणखी आठवडाभर हा संप सुरु राहिल्यास 30 लाख उत्तरपत्रिका दहावी बोर्ड परीक्षेच्या या तपासणी विना पडून राहणार आहेत. सद्यस्थितीमध्ये आजचा पेपर झाल्यानंतर तीस लाख उत्तर पत्रिका या तपासणीविना पडून राहतील. त्यामुळे निकाल वेळेत जाहीर व्हावा, त्या दृष्टिकोनातून संपासंदर्भात निर्णय होणे अपेक्षित आहे.

 

केवळ बारावीच्या परीक्षाविषयक काम करणार : शिक्षक संघटना

बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणी तसेच अकरावीच्या परीक्षा, मूल्यमापन, अध्यापन करणार नसल्याची भूमिका स्पष्ट करत जुनी पेन्शन योजना आणि इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारी निमसरकारी कर्मचारी, शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीच्या 14 मार्चपासून सुरु होणाऱ्या संपामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे शिक्षक केवळ बारावीच्या परीक्षा विषयक कार्य करतील आणि इतर कोणतेही कार्य करणार नाहीत. असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे

Protected Content