छत्रपती संभाजी महाराजांचे संघर्षमय जीवन प्रेरणादाई

WhatsApp Image 2019 05 14 at 9.09.36 PM

अमळनेर(प्रतिनिधी) छत्रपती संभाजी राजेचे संघर्षमय जिवनाचा इतिहास प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी सिमा अहिरे यांनी भगवा चौक येथे आयोजित छ. संभाजी महाराज जयंती समारंभात केले.

भगवा चौक मित्र मंडळ व संभाजी ब्रिगेडच्या वतीने आयोजित छ. संभाजी राजे जयंतीउत्सव कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी सिमा अहिरे,जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश मा.अर्चनाजी शहा, माजी आमदार साहेबराव पाटील, कृ.उ.बा.सभापती उदय वाघ, पोलिस निरीक्षक अनिल बडगुजर, मराठा सेवा संघाचे मनोहर पाटील, संजय पाटील,सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, भास्कर ठाकरे, आदित्य बिल्डर चे प्रशांत निकम,नगरसेवक श्याम पाटील,अभिजित पाटील,रामकृष्ण पाटील,मा.जि. प.सदस्य संदिप पाटील,मुख्याध्यापक एस.डी.देशमुख, मा.नगरसेवक विनोद कदम, पत्रकार उमेश धनराळे, मा.नगरसेवक विक्रांत पाटील, सुनिल भामरे,साने गुरुजी स्मारक समीतिच्या दर्शना पवार आदिंनी छ. संभाजी महाराज यांच्या भव्य प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन केले. यावेळी छ. संभाजी महाराज यांचा जयजयकाराच्या व जय जिजाऊ ,जय शिवराय च्या घोषणा देण्यात आल्यात. “छत्रपती संभाजी राजेंचा खरा इतिहास समजून घेण्यासाठी मालिका पाहण्यावरोबर पुस्तकही वाचायला हवेत.आपल्या बालकांना हिरो म्हणून छत्रपती संभाजी यांचे चरित्र सांगावे!” असे प्रतिपादन यावेळी प्रमुख वक्ते प्रा.लिलाधर पाटील यांनी केले. यावेळी तहसीलदार ज्योती देवरे यांनीही कार्यक्रमस्थळी भेट देऊन छ. संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. अरुण देशमुख,विश्वास पाटील, निलेश साळुंखे,भैय्या साहेब मगर,संभाजी ब्रिगेड चे संदेश पाटील, श्रीकांत चिखलोदकर , शिवकुमार महाजन, रणजित भिमसिंग पाटील,कैलास पाटील, नरेंद्र अहिरराव कृ. उ.बा. संचालक पराग पाटील,प्रफुल्ल पाटील , एस.एम पाटील आदिंसह विविध पुरोगामी बहुजन संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन संजय हरी पाटील यांनी केले, आभार प्रशांत निकम यांनी मानले .शिवकुमार महाजन, पिंटू बागुल, जगतराव पाटील, आनंद दुसाने,कालू वर्मा, दिपक शिसोदे,विंचूरकर सर,राजेन्द्र देशमुख, राजेंद्र पाटील, आर.पी.पाटिल, शरद पाटील,भैय्या हिंगोनेकर, ललित पाटील,रोहन भोसले, गौरव पाटिल आदिंनी उपस्थिती देत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Add Comment

Protected Content