Home धर्म-समाज संत रविदास उत्सव समिती अध्यक्षपदी संदीप गाडेकर

संत रविदास उत्सव समिती अध्यक्षपदी संदीप गाडेकर

0
47

 

पाचोरा प्रतिनिधी । संत रविदास उत्सव समितीच्या पाचोरा अध्यक्षपदी संदीप गाडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

संत रविदास जयंती साजरी करण्याबाबत विचार-विनीमय करण्यासाठी पारोळा येथील उपनगराध्यक्ष दिपक अनुष्ठान यांच्या अध्यक्षतेखाली व प्रदेशाध्यक्ष मोतीलाल अहिरे, जिल्हा अध्यक्ष विनोद बेरभैया, युवक जिल्हाध्यक्ष गंगाराम तेली यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच बैठक संपन्न झाली. प्रारंभी चर्मकार समाजाचे कै. शरद बन्सी, रवी मोरे, सरस्वती अहिरे, चर्मकार समाजातील शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच संत रविदास जयंती उत्सव पाचोरा येथील अध्यक्षपदी संदिप गाडेकर, उपाध्यक्ष बबलू लिंगायत, कार्याध्यक्ष पप्पू अहिरे, सचिव पप्पू लिंगायत, खजिनदार वसंत वाघ, सल्लागार रमेश चव्हाण, नाना मोरे, वाल्मीक अहिरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

याप्रसंगी पाचोरा तालुक्यात निवडून आलेले नवनिर्वाचित सरपंच राजेंद्र सावंत (गाळण बु) ग्रामपंचायत सदस्य रवींद्र कौतिक चव्हाण, साखरचंद धोंडू चव्हाण (तारखेडा बु), गुरुलाल पवार (साजगाव) यांचा समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच चर्मकार उठाव संघाचे शहराध्यक्ष गोपाल मोरे यांची तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. तर शहराध्यक्षपदी आकाश पवार यांची निवड करण्यात आली.

याप्रसंगी पारोळा पंचायत समिती उपसभापती विजय पाटील, शहराध्यक्ष किरण आठवले, विभागिय उपाध्यक्ष राजु सावंत, तालुकाध्यक्ष नितीन तायडे, युवक तालुका अध्यक्ष पप्पू अहिरे, तालुका सचिव दिलीप आहिरे, यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकार्‍यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. पाचोरा शहरातील जवाहर हाऊसिंग सोसायटी शाखा अध्यक्षपदी बबलू संजय लिंगायत, संत रविदास नगर शाखा अध्यक्षपदी कुंदन देसाई, संत गाडगेबाबा नगर अध्यक्षपदी रोहित अहिरे, कार्याध्यक्षपदी दिपक सोनवणे, कृष्णापुरी शाखा अध्यक्ष नितीन बेंडाळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

या बैठकीस ज्येष्ठ नेते वसंत वाघ, नाना मोरे, नामदेव देवरे ,रमेश चव्हाण, भिकन वाघ, राजू पटाईत, मोतीलाल पवार, रमेश लोंढे, मनोज निकम, दिपक मोरे, बबलू लिंगायत, लखीचंद मोची पूनगाव, दिपक मोरे सह तालुका व शहरातील समाजबांधव उपस्थित होते.


Protected Content

Play sound