Home Cities पाचोरा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार किशोर पाटील व सुमित पाटील यांनी पाचोऱ्यात बजावला...

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार किशोर पाटील व सुमित पाटील यांनी पाचोऱ्यात बजावला मतदानाचा हक्क

0
3


पाचोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीतील उर्वरित ९ जागांसाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. पाचोरा शहरातील गिरड रोडवरील श्री गो. से. हायस्कूल येथील मतदान केंद्रावर दोन बूथच्या माध्यमातून १९४ मतदार मतदानाचा हक्क बजावत असून, पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील आणि यापूर्वीच बिनविरोध निवड झालेले सुमित किशोर पाटील यांनीही मतदान केले.

जिल्हा बँकेच्या उर्वरित संचालक पदांसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेला आज सकाळपासून प्रारंभ झाला. पाचोरा शहरातील गिरड रोडवरील श्री गो. से. हायस्कूल येथे मतदानासाठी दोन बूथ उभारण्यात आले आहेत. या मतदान केंद्रावर एकूण १९४ मतदार असून, मतदारांकडून मतदानाचा हक्क बजावला जात आहे. पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदान केले. त्यांच्यासोबत यापूर्वीच बिनविरोध निवड झालेले सुमित किशोर पाटील यांनीदेखील मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील मतदान प्रक्रियेमुळे सहकार क्षेत्रातील राजकीय घडामोडींना महत्त्व प्राप्त झाले आहे.


Protected Content

Play sound