सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा

मुंबई प्रतिनिधी । कोरोनाच्या आपत्तीमुळे रखडलेल्या सहकाराच्या निवडणुका होणार असल्याचा मार्ग आता मोकळा झाला असून आज याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

 कोरानाच्या आपत्तीमुळे राज्यातील सर्व निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याला दोनदा पुढे ढकलण्यात आले होते. दरम्यान, राज्यातील कोरोनाचा प्रकोप हा बर्‍याच प्रमाणात कमी झालेला आहे. यातच काही दिवसांपुर्वी राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका यशस्वीपणे पार पडल्या. या अनुषंगाने आज राज्याच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग खात्याने लवकरच सहकार खात्याच्या निवडणुका घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. याबाबतचा शासन निर्णय देखील जाहीर करण्यात आला आहे.

राज्यातील अनेक साखर कारखाने, जिल्हा बँका, दूध संघ आदींसह विविध सहकारी संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया यामुळे आता गतीमान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Protected Content