अयोध्या सोहळयासाठी व्हीव्हीआयपी यादी आली समोर

अयोध्या-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा |  अयोध्या नगरी रामलल्लाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. या सोहळयासाठी अनेक वीवीआयपी लोक उपस्थित राहणार आहे. त्याची यादी तयार झाली आहे.अयोध्येच्या कार्यक्रमासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अध्यक्ष शरद पवार  आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रण पाठवलं जाणार आहे. याशिवाय वंचितचे प्रकाश आंबेडकर आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवलं जाणार आहे. राम जन्मभूमी न्यासाने ज्या निमंत्रण पत्रिका कुरिअर केल्या आहेत त्यामध्ये या सर्व नेत्यांनी नावं आहेत.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि संसदीय पक्षाच्या प्रमुख सोनिया गांधींना निमंत्रण देण्यात आलं आहे. आतापर्यंत सचिन तेंडुलकर आणि विराट कोहलीला निमंत्रण मिळाले आहे. अयोद्धेत 22 जानेवारी रोजी लाखोंची गर्दी होणार आहे. त्यामध्ये देशातील विविध पक्षांचे प्रमुख, सेलिब्रिटीही असणार आहेत.

22 जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी मुंबईतील जवळपास साडेतीनशे व्हीव्हीआयपींना निमंत्रण देण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी मुंबईतून निमंत्रित असलेल्या व्हीव्हीआयपींची यादी देखील तयार करण्यात आलीये. यामध्ये मुंबईतील संत महंत, राजकीय पक्षाचे पक्षप्रमुख अध्यक्ष, खेळाडू, चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार, मोठे उद्योगपती त्याचप्रमाणे महत्त्वाचे काही सेलिब्रिटीज यांना देखील निमंत्रण दिले जाईल. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, अयोध्या या नावाने सर्वांना निमंत्रण पाठवले जाणार असून  यासाठी प्रचारक म्हणून जबाबदाऱ्यांचे वाटप सुद्धा करण्यात आलं आहे

Protected Content