कोरोनाची दुसरी लाट अन् यावल तालुक्यात हिवतापाच्या रुग्णात वाढ !

यावल प्रतिनिधी । तालुक्यात थंडीचा जोर वाढल्यामुळे खोकला, सर्दी व हिवतापाचे रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होतांना दिसत आहे. दरम्यान कोरोना विषाणु संसर्गाची दुसरी लाट ही अत्यंत धोकादायक असुन या संसर्गात येण्याच्या संकेताने आरोग्य विभागाच्या स्थानिक आरोग्य यंत्रणेची चांगलीच चिंता वाढवली आहे. 

दरम्यान मागील काही दिवसांपासुन यावल तालुक्यात आलेल्या थंडीने थोड्या विश्रांतीनतंर पुन्हा आगमन केले. थंडीच्या परतीमुळे बदललेल्या वातावरणामुळे तालुक्यातील मोठया संख्येत नागरीकांमध्ये हिवताप ,सर्दी खोकल्याचे रुग्ण वाढल्याने आरोग्य यंत्रणेला अधिक तत्पर राहावे लागणार आहे. तालुक्यातील नागरीकांमध्ये सात्याने हिवतापा व सर्दी खोकल्याच्या वाढत्या रुग्ण संख्येने कोरोना विषाणु संसर्ग हा परत येतो की काय अशी भिती नागरीक व्यक्त करीत आहे. कोरोना संसर्गाची भितीने शासनाने विषाणुची दुसरी लाट येण्याचे संकेत दिले असल्याने या भितीमुळे संभाव्य धोका पत्कारण्यापुर्वी नागरीक योग्य वेळेवर खाजगी रुग्णालयात आपले उपचार करून घेत असल्याचे दिसुन येत असुन, कोरोना विषाणु संसर्गाच्या पुनश्च आगमनाच्या संभाव्य शक्यतेने तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील विविध  जिल्ह्यांमध्ये कोरोना या संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावल तालुक्यातील नागरीकांनी सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे काटेकोर पालन करून सतर्क राहावे असे आवाहन प्रांत आधिकारी कैलास कडलग यांनी केले आहे .

 

Protected Content