नगरसेविका देवयानी महाजन यांना दिलासा; अपात्रतेची मागणी फेटाळली

यावल प्रतिनिधी । येथील नगर परिषदेच्या नगरसेविका देवयानी महाजन यांच्या कुटुंबियातील सदस्यांनी मंजुरीपेक्षा जास्तीचे व बेकायदेशीर बांधकाम केल्याच्या आरोपावरून माजी नगराध्यक्षा यांच्या पतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे महाजन यांना अपात्रतेचा केलेला तक्रार अर्ज जिल्हाधिकारी अभीजीत राऊत यांनी नामंजूर करत नगरसेविका देवयानी महाजन यांचे पद अबाधित ठेवले अहे.

येथील नगरसेविका देवयांनी धिरज महाजन यांचे सासरे प्रकाश महाजन यांनी आपल्या मालकीच्या घर जागेवर पालिकेकडून ३९.९६ चौ. मीटर बांधकामाची परवानगी घेतलेली असतांना १११ चौरस मीटर बांधकाम केले. यात काही जागा अतिक्रमीत असल्याच्या  आशयाची तक्रार तत्कालिन नगराध्यक्ष सुरेखा कोळी यांचे पती शरद रंगु कोळी यांनी जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडे नोव्हेंबर २०१८ मध्ये केली होती.  जिल्हाधिकारी जळगाव यांनी मंगळवारी (ता. २४) दिलेल्या आदेशान्वये कोळी यांचा मागणीचा अर्ज महाराष्ट्र नगरपरिषद,नगरपंचायत व औद्योगीक नागरी अधिनियम १९६५ चे कलम ४४ (१) प्रमाणे नामंजूर करत, नगरसेविका देवयानी महाजन यांचे नगरसेविका पद अबाधित ठेवले असल्याचा निर्णय दिला आहे. त्यामुळे सत्ताधारी गटात समाधान व्यक्त होत आहे.

 

Protected Content