Home Cities यावल नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आ. अमोल जावळे बांधावर; तातडीच्या पंचनाम्यांच्या सूचना

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आ. अमोल जावळे बांधावर; तातडीच्या पंचनाम्यांच्या सूचना

0
1


यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । १ जून रोजी झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे रावेर तालुक्यातील पाडळे बुद्रुक, पाडळे खुर्द, निरुळ, पिंप्री, खिरवड तसेच परिसरातील यावल तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल (कल्पना हरिभाऊ) जावळे यांनी आज नुकसानग्रस्त भागाचा दौरा करून शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.

 


Protected Content

Play sound