Home क्राईम हाणामारी प्रकारणातील एकाला अटक; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

हाणामारी प्रकारणातील एकाला अटक; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

0
107

जळगाव प्रतिनिधी । शहरातील नाथवाडा येथे झालेल्या हाणामारीतील संशयित आरोपीस आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

शहरातील  नाथवाडा परिसरातील जोगेश्‍वर मित्र मंडळात काही तरुण गरबा पाहण्यासाठी आले होते. याठिकाणी तीन चार जणांनी त्या तरुणांना बेदम मारहाण करीत जखमी केले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी हिरामण एकनाथ जोशी (३०) रा. नाथवाडा, सिंधी कॉलनी हा फरार होता. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हिरामण जोशी याच्या मुसक्या आवळल्या असून त्याला पुढील कार्यवाहीसाठी एमआयडीसी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound