मेहरूण तलावात चौघा बालकांच्या जीवावर बेतले : तिघे बचावले; एकाचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जळगाव शहरातील मेहरुण तलावामध्ये आंघोळीसाठी गेलेल्या शाहू नगरातील चार मुले पाण्यात बुडाले होते, सुदैवाने यापैकी तीन जणांना वाचविण्यात यश आले, मात्र ईशान शेख वसीम (वय-१३, रा. शाहू नगर) या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार, २९ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास मेहरुण तलाव परिसरात घडली.

याबाबत माहिती अशी की, जळगावातील शाहू नगर परिसरात राहणारे ईशान शेख वसीम, मोईन खान अमीन खान (वय- १३), अयान तस्लीम भिस्ती (वय-१३) व असलम शेख सलाउद्दीन (वय-१३) सर्व रा. शाहूनगर, जळगाव हे चौघे जण शुक्रवारी २९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मेहरुण तलाव परिसरात आंघोळीसाठी गेले. चौघेही पाण्यात उतरले व काही वेळातच ते गटांगळ्या खाऊ लागले. हा प्रकार आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात आला. यावेळी चौकांपैकी तिघांना वाचवण्यात यश आले मात्र ईशान शेख वसीम या मुलाचा बुडून मृत्यू झाला.

दरम्यान, ही माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तलावाकडे धाव घेऊन ईशान शेख वसीमचा मृतदेह बाहेर काढला. मृताच्या आप्तांनी अपघातस्थळी प्रचंड आक्रोश केला. तर, यातून मेहरूण तलावाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

Protected Content