Home क्राईम अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई

अट्टल गुन्हेगारावर एमपीडीए अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यासह नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या रवी उर्फ माया महादेव तायडे (२५, रा. मुक्ताईनगर, जि. जळगाव) याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करत स्थानबद्ध करण्यात आले. तसे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी शनिवारी ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता दिले.

याबाबत अधिक माहिती अशी की, रवी तायडे याच्यावर भुसावळ बाजारपेठ, शहर, मुक्ताईनगर पोलिस ठाण्यासह नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या प्रकारचे ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत. तसेच दोन वेळा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. तरीदेखील त्याच्या वर्तवणुकीत सुधारणा न झाल्याने मु्क्ताईनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांनी त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला.

पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्तावाचे कामकाज स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ट पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील, सहाय्यक फौजदार युनूस शेख ईब्राहीम, पोहेकॉ सुनील दामोदरे, जयंत चौधरी, पोकॉ ईश्वर पाटील यांनी पाहिले. जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानबद्धतेचे आदेश दिल्यानंतर रवी तायडे याची कोल्हापूर कारागृहात रवानगी करण्यात आली.


Protected Content

Play sound