जळगाव जिल्ह्यात उद्यापासून नेमके काय सुरू होणार ? : वाचा विस्तृत माहिती

जळगाव प्रतिनिधी । जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत जिल्ह्यात ५ मे पासून नेमकी कोणती दुकाने सुरू होणार आहेत याची माहिती दिली आहे. तसेच लॉकडाऊनमधील उर्वरित कालावधीत प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या शिथीलतेच्या अन्य बाबींची माहिती देखील त्यांनी दिली.

लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्पयाची माहिती देण्यासाठी येथभ्ल नियोजन भवनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ ढाकणे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी वार्तालाप करताना बोलत होते. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, महानगरपालिकेचे आयुक्त सतिश कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पाटील आदि उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती देतांना पुढे सांगितले की, सर्व प्रकारच्या ग्राहकउपयोगी दुकाने सुरु ठेवण्याची अनुमती देत असतानाच त्यांना काही अटी व शर्ती घालून दिलेल्या आहेत. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करणे, ग्राहक आणि दुकानदार यांनी मास्क वापरणे, दुकानाच्या बाहेर ग्राहकांसाठी सॅनिटायझर उपलब्ध करुन देणे, दिलेल्या वेळेतच दुकाने सुरू ठेवणे अशाप्रकारे नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यास दिलेल्या सवलती पुढेही सुरू ठेवता येतील. यातील लक्षणीय बाब म्हणजे उद्यापासून जिल्ह्यातील वाईन शॉप्स सुरू होणार आहेत. लग्नसमारंभास 50 लोकांची उपस्थिती तर अंत्ययात्रेस 20 लोक उपस्थित राहू शकतील याप्रमाणे परवानगी असेल मात्र तेथेही सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन अपेक्षित आहे.

सर्व प्रकारची दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देत असताना सार्वजनिक वाहतूक, धार्मिक कार्यक्रम, शाळा, महाविद्यालये, मॉल्स, स्पा, सलुन दुकाने, ब्युटीपार्लर, हॉटेल्स, रेस्टॉरंट, परमीट रुम, बार 17 मे पर्यंत बंद राहतील. आतापर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 52 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यातील 2 बरे होवून त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 13 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला असून 3 रुग्णांचा दवाखान्यात दाखल करण्यापुर्वीच मृत्यू झालेला होता. तर आणखी 3 रुग्ण अत्यावस्थस्थितीतच दाखल झाल्याने त्यांचा 1 ते 4 दिवसांच्या आत मृत्यू झालेला आहे. त्यांना या आजारासोबतच इतरही जूने आजार असल्याचे निष्पण झाले आहे. लवकरच जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्ग तपासणी प्रयोगशाळा सुरु होणार असल्याचेही यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी सांगितले.

येथील कोविड रुग्णालयात सर्व रुग्णांची व्यवस्थित काळजी घेतली जात असून पीपीई किट, मास्क, सॅनिटायझरचा अजिबात तुटवडा नाही. त्याचबरोबर जिल्ह्यात औषधे व उपकरणांचा कमतरता नाही. जिल्ह्यात सुरक्षा तसेच दक्षतेच्या कारणास्तव एकूण 16 कटन्मेंट झोन तयार केले आहेत त्यामधील नागरिकांना बाहेर जाता किंवा बाहेरून त्यामध्ये कोणासही प्रवेश करता येणार नाही. या झोनमधील 60 वर्षावरील नागरीकांची विशेष दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या आहे. जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर स्थापन करण्यात आले आहे. त्याचबरोबर वैद्यकीय कारण वगळता मुंबई/पुण्यातून कोणालाही जिल्ह्यात येण्यासाठी तसेच जाण्यासाठी परवानगी नाही. त्याचबरोबर जिल्ह्याच्या सिमा 17 मे पर्यंत बंदच राहणार असून मजूर, विद्यार्थी यांना जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी त्यांची पुर्णपणे वैद्यकीय तपासणी करून त्यांच्यात कोरोनाचे कुठल्याही प्रकारचे लक्षणे नाही याची खात्री पटल्यावरच त्यांना त्यांच्या जिल्ह्यात जाण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने पास निर्गमित करण्यात येत आहे. जिल्ह्यातील नागरीकांनी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी अनावश्यक प्रवास टाळावा. विनाकारण घराबाहेर पडू नये, मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी शेवटी केले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी मास्क न वापरणाऱ्यांना 500 रुपये दंड आकारला जात आहे. याबाबत कोणालाही सुट दिली गेली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्वस्त धान्य दुकानांच्या वाटप प्रकियेत शिक्षकांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत, त्यांना सर्वांनी सहकार्य करून धान्य वाटप अधिक पारदर्शक होण्यासाठी मदत करावी.

जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी कोरोनापासून स्वत:चा व आपल्या परिवाराचा, परिसरातील सर्व नागरिकांचा कसा बचाव करू शकाल याची विस्तृतपणे माहिती स्पष्ट केली. जनता कर्फ्युमध्ये पोलीस आपली जबाबदारी चोखपणे बजावत आहेत. तपासणी नाक्यांवर कडक बंदोबस्त आहे. अनधिकृतपणे जिल्ह्यांच्या सिमा ओलांडण्याच्या प्रयत्न हाणून पाडण्यासाठी पोलिसांसोबत ग्राम रक्षक दल, ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करण्यात आली असून ते आपले काम चोखपणे बजावत आहे तेव्हा जनतेनेही त्यांना सहकार्य करून कोरोना विषाणू घालवण्यासाठी मीच रक्षक बनावे, असे आवाहनही यावेळी त्यांनी केले.

महानगरपालिकेचे आयुक्त सतिश कुलकर्णी यांनी प्रसारमाध्यमांना संबोधतांना सांगितले की, 28 मार्च व 1 एप्रिल या दोन दिवसात जिल्ह्यात दोनच कोरोनाचे रुग्ण होते त्यातील एकाचा मृत्यू तर एक बरा होवून त्याला घरी पाठविण्यात आल्यानंतर जिल्हा कोरोना मुक्त झाल्याने आपण सुटकेचा निश्वास सोडला होता. परंतु दुर्देवाने हा आनंद फार काळ आपल्याला टिकवता आला नाही आणि कुणाच्यातरी संपर्कात आल्याने आणि कुणाच्यातरी संसर्गामुळे जिल्ह्यतील रुग्णांची संख्या 52 वर पोहचली आहे. कारण हा आजार केवळ संपर्क आणि संसर्गामुळेच बळावतो घरात बसून हा आजार आपल्या जवळ येवूच शकत नाही. कफ्युचे प्रत्येक नागरिकाने काटेकोरपणे पालन केलेच पाहिजे. विशेष म्हणजे प्रतिबंधिक क्षेत्रात कटाक्षाने नियम पाळणे आवश्यक आहे. किरकोळ भाजी विक्रेत्यांनी दोन दुकानांमध्ये किमान 20 फुट अंतर आणि त्यांच्या दुकानासमोर एकावेळेस एकच ग्राहक असेल याची संपूर्ण जबाबदारी भाजी विक्रेत्यावर असेल. यात दिरंगाई आढळल्यास त्या विक्रेत्यास दंड आणि त्याचे

Protected Content