लॉकडाऊनच्या काळात गायत्रीने साकारले विविध चित्रांचा अविष्कार….!

जळगाव (तुषार वाघुळदे)। सध्या कोरोनामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात सर्वच जण आपापल्या घरी वेळेचा सदुपयोग करण्याचे मार्ग शोधत आहेत, तसेच आपल्या आप्तेष्टांना भेटण्यासाठी व्याकुळ होत आहेत. अशा काळात शहरातील शिवकॉलनी येथील कु. गायत्री देवेंद्र वारडे या युवतीने अतिशय सुंदर सेल्फ प्रोट्रेट बनवले आहे.

गायत्री उर्फ नितु ही मेकॅनिकल इंजिनिअर असून स्वतःतील कलागुणांना चालना देत या काळात तिने अनेक व्यक्तिचित्रे साकारली आहेत. काही तैलरंगातील आहेत तर काही स्केच ..!! गायत्री ही एक लहरी स्वभावाची असून आपल्याच विश्वात मग्न असते. हळव्या मनाची ही तरुणी घरातील कामे आटोपून विविध चित्र साकारण्याचा जणू तिने चंगच बांधला आहे. ती सध्या ‘प्रेम’ या विषयावर काम करत असून स्वतःचे पेंटिंग बनवून तिने स्वतःशी प्रेम करण्याचा संदेशच जणू दिला आहे.

हौशी कलावंत गायत्री हिने व्यक्तिचित्रे, निसर्गचित्र, वारली यासह अनेक पेन्सिल स्केचही साकारली आहेत. चित्रकला ही एक वेगळीच कला ..! मानवी सर्जनशीलतेचा अविष्कार यातून दिसून येतो.चित्र म्हणजे काहीतरी नेत्रदीपक, असामान्य, आश्चर्यकारक, आकाश व स्वर्ग ..!! गायत्री वारडे म्हणते ‘मी कोणाकडे चित्रकला शिकली नाही, कदाचित ‘गॉड गिफ्टेड’ असू शकते. माझ्या हातून अप्रतिम अविष्कार साकारला जात असल्याचा आनंद होतोय. लॉकडाऊनच्या कालावधीत मी खूप काही शिकले आणि कोरोनाने शिकवलं देखील..असंही तिने सांगितले..गायत्री हिला या कलेसह नाणे जमविण्याचा छंद असून हस्तकलेतही ती पारंगत आहे .वडील देवेंद्र पुनमचंद वारडे हे व्यावसायिक असून तेही छंदवेडे व कलंदर व्यक्तिमत्त्व आहेत.

Protected Content