जिल्ह्यात गुरे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; पाच जणांना अटक

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून गुरे चोरून वाहतूक टोळीचा पर्दाफाश केला असून या गुन्ह्यात पाच संशयित आरोपींना अटक केली आहे. संशयितांना गुन्ह्याची कबुली दिली असून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील रोहिणी गावाजवळ हॉटेल तिरंगाजवळ पोलीसांनी केलेल्या नाकाबंदीत २४ नोव्हेंबर पोलीसांनी अवैधरित्या गुरांची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली होती. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीसात गुन्हा नोंदविण्यात आला होता. यात पाच संशयितांना अटक करण्यात आली होती. संशयितांची अधिक चौकशी केली असता त्यांनी जळगाव जिल्ह्यातील जळगाव, चाळीसगाव, अमळनेर, पाचोरा, पारोळा, भडगाव त्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यातील नांदगाव, धुळे, मनमाड अशा १४ ठिकाणांहून गुरे चोरी केल्याचे कबुल केले. यासह नाशिक, औरंगाबाद, धुळे जिल्ह्यातील ३० ठिकाणी गुरांची चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. पाच संशयितांमध्ये एक अल्पवयीन आरोपी आहे. सर्वांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. संशयितांनी विविध ठिकाणाहून चोरलेली एकुण ३३ गुरांची विक्री मालेगाव येथे केली होती. पोलीसांनी सर्व गुरे ताब्यात घेतली असून यात गुन्ह्यातील वाहन क्रमांक ( एमएच ०३ एएच २६९४ ) टाटा सुमो ताब्यात घेतले आहे.

यांनी केली कारवाई

पोलीस अधिक्षक प्रविण मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, विभागीय पोलीस अधिक्षक कैलास गावडे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या सुचनेनुसार सपोनि रमेश चव्हाण, धरमसिंग सुंदरडे, पोउनि लोकेश पवार, पोहेकॉ युवराज नाईक, पो.ना. नितीन आमोदकर, गोवर्धन बोरसे, शांतीलाल पगारे, भूपेश वंजारी, शांताराम पवार, प्रेमसिंग राठोड, ज्ञानेश्वर बडगुजर, देविदास पाटील, कैलास पाटील, लालसिंग पावरा, दिनेश पाटील, भगवान पाटील, संदीप माने, पोहेकॉ ओंकार सुतार, भगवान माळी, जयंत सपकाळे, शंकज जंगाळे, दत्तू महाजन, राजेंद्र पाटील, प्रविण सपकाळे, अनिल आगोणे, मनोहर पाटील यांनी केली.

Protected Content