जिल्ह्यात आज ६९६ कोरोना पॉझिटिव्ह; जळगावसह अमळनेरात संसर्ग वाढला

जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आज ६९६ नवीन कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहे. आज जिल्ह्यात जळगाव शहरात १६९ एकाच दिवशी आढळून आले आहे. यासह चोपडा, रावेर, पारोळा आणि अमळनेरात पुन्हा संसर्ग वाढल्याचे दिसून येत आहे. आजच ५१५ पेशंटनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाने आज सायंकाळी जाहीर केलेल्या प्रेस नोटनुसार जिल्ह्यात ६९६ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत. आज सर्वाधीक १६९ रूग्ण हे जळगाव शहरात आढळून आले आहेत. याच्या खालोखाल अमळनेर- १४२, चोपडा-७८, पारोळा-५९ रूग्ण आढळून आले आहेत.

आजची आकडेवारी
संपूर्ण तालुक्यांचा विचार केला असता, जळगाव शहर-१६९; जळगाव ग्रामीण-५९; भुसावळ-२६; अमळनेर-१४२; चोपडा-७८; पाचोरा-१२; भडगाव-१२; धरणगाव-२३; यावल-११; एरंडोल-५; जामनेर-३४; रावेर-२७; पारोळा-५९; चाळीसगाव-२७; मुक्ताईनगर-८; बोदवड-३ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील १ असे एकुण ६९६ रूग्ण आढळून आले आहेत.

तालुकानिहाय एकुण आकडेवारी
जळगाव शहर-६१२४; जळगाव ग्रामीण-१४९७; भुसावळ-१५२३; अमळनेर-२२४७; चोपडा-२२६४; पाचोरा-१०७३; भडगाव-१२२३; धरणगाव-१२९९; यावल-८८३; एरंडोल-१५२१; जामनेर-१८४६; रावेर-१३३७; पारोळा-१३३५; चाळीसगाव-१६३२; मुक्ताईनगर-८१८; बोदवड-३७३ व दुसर्‍या जिल्ह्यांमधील १४० असे एकुण २७ हजार १३५

आजच्या रिपोर्टनंतर जिल्ह्यातील आजवरच्या कोरोना बाधीतांची संख्या २७ हजार १३५ इतकी झालेली आहे. यातील १९ हजार २१३ रूग्ण बरे झाले आहेत. यात आजच ५१५ रूग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली आहे. तर आज ८ मृत्यू झाले असून मृतांचा आकडा ८०६ इतका झालेला आहे. दरम्यान आता सध्या ७ हजार ११६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत.

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today, livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news, amalner corona, amalner corona news, amalner corona updates, amalner, amalner news, amalner latest news, corona alamner, chalisgaoncoronanews, chalisgaoncoronaupdates, bhusawalcorona, bhusawalcoronaupdates, bhusawalcoronanews

Protected Content