जळगावात कोरोनाचा संसर्ग वाढलेलाच; जिल्ह्यातील बाधीतांचा आकडा २८ हजारांच्या पार

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरामधील कोरोनाचा संसर्ग हा वाढलेलाच असून जिल्ह्यात आज एकूण ५४१ रूग्ण आढळून आले आहेत. तर जिल्ह्यातील एकूण बाधितांचा आकडा हा २८ हजारांच्या पार गेला आहे.

आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात ५४१ कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून ५३२ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यात सर्वाधीक ११७ रूग्ण हे जळगाव शहरातील आहेत.उर्वरित जिल्ह्याचा विचाऱकेला असता जळगाव ग्रामीण२९; भुसावळ-३५; अमळनेर-९०; चोपडा-५७; पाचोरा-८; भडगाव-११; धरणगाव-३३; यावल-१०; एरंडोल-३१; जामनेर-५७; रावेर-५; पारोळा-२४; चाळीसगाव-६; मुक्ताईनगर-१२; बोदवड-११ व इतर जिल्ह्यातील ५ अशी रूग्ण संख्या आढळून आली आहे.

आजची रूग्ण संख्या पकडली असता जिल्ह्यातील रूग्णाची एकूण संख्या २८१३२ इतकी झालेली आहे. यातील २०२६८ रूग्ण बरे झाले आहेत. तर ७०४२ रूग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर एकूण मृतांची संख्या देखील ८२२ इतकी झालेली आहे.

Protected Content