चिंचोली गावात नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यासाठी महावितरणला निवेदन

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील चिंचोली गावात नवीन ट्रान्सफार्मर बसविण्यासाठी भारतीय जनता पार्टी तालुक्याच्या वतीने जळगाव येथील विद्यूत महावितरणाच्या मुख्य कार्यकारी अभियंता निवेदन आज १० फेब्रुवारी रोजी देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील चिंचोली गावात ट्रान्सफॉर्मर गेल्या 40 दिवसपासून नादुरुस्त असून गावातील ग्रामस्थ अंधारात आहेत, ग्रामस्थांनी वेळोवेळी संबंधित अधिकारी यांना सांगून सुद्धा ट्रान्सफॉर्मर बसविला गेला नाही. भाजपाचे तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे यांच्याकडे ग्रामस्थांनी आपली व्यथा मांडली.  त्यानुसार आज ग्रामस्थांसह जळगावातील महावितरण विद्यूत कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देवून नवीन ट्रान्सफार्मर बसविण्याची मागणी केली. आहे. दरम्यान मागणी पुर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष गोपाळ भंगाळे, सरचिटणीस अरुण सपकाळे, संदीप पाटील, विलास घुगे, सागर घुगे, सुनील लाड, मिनील लाड, सुभाष पवार, सोपान मानकर, सिंगम पाटील, सुधाकर ढाकणे, आनंद घुगे, वैभव वाघ, दीपक पवार, मयुर पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Protected Content