शिवाजीनगर परिसरात प्रत्येक घरात होणार सॅनिटायझर फवारणी

 

जळगाव, प्रतिनिधी । शिवाजीनगर भागामध्ये कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत असल्यामुळे शिवाजी नगर मधील श्री गणेश क्रीडा सांस्कृतिक सामाजिक व शैक्षणिक संस्था तसेच गुरुदत्त सांस्कृतिक क्रीडा मंडळ व इतर संस्था व नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन स्वखर्चाने फवारणी करण्यात येणार आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने घरोघरी जाऊन स्वखर्चाने नागरिकांचे संपूर्ण घर सॅनीटायझर फवारणी करण्यात येणार आहे. घरोघरी सॅनेटायझर मारण्याचे उद्देश असे की महापालिकामधील कर्मचारीवर्ग अपुरा असल्यामुळे त्यामुळे कर्मचाऱ्यांना पुष्कळसा ताण पडत असल्यामुळे नगरसेवक नवनाथ दारकुंडे व इतर संस्थांनी पुढाकार घेतला आहे. या मोहिमेत जर कोणाचेही घर सुटल्यास खालील प्रमाणे दिलेल्या मोबाईल नंबर वर संपर्क करावा तसेच संस्थेकडून व नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी आवाहन केले आहे.

संपर्कासाठी मोबाईल नंबर :  अतुल हराळ:-९८५०३८८३१२, भगवान सोनवणे:-९८६०२०१३९९, हिरामण तरटे:-९४२२२८३६१९, विनायक पाटील:-८८८८२२७७७५, निशिकांत पाटील:-८०८७१५२५९४, संजय शिंपी:-७७९८६५३५००, अमोल नेरकर:-९८२३३३९८५९, सिद्धार्थ दारकुंडे:-८६६८२७६८२३

Protected Content