Home क्राईम कानळदा येथून अल्पवयीन मुलीला पळविले; तालुका पोलीसात गुन्हा

कानळदा येथून अल्पवयीन मुलीला पळविले; तालुका पोलीसात गुन्हा

0
108

जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील कानळदा येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फुस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीला आली. तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की, तालुक्यातील कानळदा येथील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या आईवडीलांसह राहते. ८ जून रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास मैत्रीणीकडे पेपर लिहिण्यासाठी जाते असे सांगून घरातून निघाली. रात्री उशीरापर्यंत ती घरी न आल्यामुळे तिचे पालक मैत्रीणीच्या घरी चौकशीसाठी गेले असता मुलगी आलीच नसल्याचे समाजले. दरम्यान, इतर मित्रमैत्रीण आणि नातेवाईकांकडे शोधाशोध केली परंतू मुलगी मिळून आली नाही. अज्ञात व्यक्तीने तिला फुस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आजोबांच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. तक्रारीवरून तालुका पोलीस ठाण्यात गुरूवारी रात्री उशीरा अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ सतिष हारनोळ करीत आहे. 

 


Protected Content

Play sound