रोहिणी खडसेंनी पर्यावरणपुरक पद्धतीने दिला बाप्पांना निरोप

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे खेवलकर यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्या घरच्या गणरायाचे विसर्जन केले आहे. यंदा घरी बनवलेल्या हौदात त्यांनी गणपती बाप्पाचे विसर्जन केले व घराच्या परिसरात गणपती बाप्पांची आठवण म्हणून एक कडुलिंबाचे झाड देखील लावले.

यावर्षी कोरोना मुळे प्रशासनाने यावर्षी मिरवणुका आणि सार्वजनिक ठिकाणी गणेश विसर्जनावर निर्बंध घालून कृत्रिम तलावात किंवा मूर्तिदान करून विसर्जन करण्यास सांगितले आहे. याबाबी लक्षात घेऊन जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह बँकेच्या अध्यक्ष रोहिणी खडसे खेवलकर यांनी आगळ्या वेगळ्या पद्धतीने आपल्या घरच्या गणरायाचे विसर्जन केले. घरी बनवलेल्या हौदात त्यांनी गणपती बाप्पाचे विसर्जन केले व घराच्या परिसरात गणपती बाप्पांची आठवण म्हणून एक कडुलिंबाचे झाड लावले. दहा दिवसांत गणरायाला जे हार फुले वाहून जे निर्माल्य जमा झाले होते ते निर्माल्य झाडाला खत म्हणून टाकले माती पासून बनवलेल्या गणपती बापाची स्थापना केली असल्या कारणाने विसर्जन केलेल्या बापाची मूर्ती पाण्यात विरघळल्या नंतर ते पाणी त्या कडुलिंबाच्या झाडाला टाकण्यात येणार आहे. यातून एक पर्यावरण रक्षणाचा संदेश रोहिणी खडसे खेवलकर यांनी दिला आहे. गणरायाच्या विसर्जन प्रसंगी रोहिणी खडसे खेवलकर, डॉ प्रांजल खेवलकर, माजी सरपंच पुष्पाताई खेवलकर, डॉ मनिष खेवलकर, प्राजक्त खेवलकर ,पांडुरंग नाफडे उपस्थित होते

गणेशोत्सव हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव असल्याने तो अतिशय आनंदात आणि उत्साहात साजरा केला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाने एकत्र यावे, यासाठी लोकमान्य टिळक यांनी या उत्सवाला सार्वजनिक रुप दिले. तेव्हापासून महाराष्ट्रात घरोघरी आणि सार्वजनिक मंडळाद्वारे गणरायाची स्थापना केली जाते गणेशोत्सवात गणपती बाप्पा समोर देखाव्यांची आरास केली जाते नाटक देखावे या माध्यमातून समाज प्रबोधन करून मोठ्या हर्षोल्हासात दहा दिवस गणपती बाप्पांची पुजा अर्चना केली जाते. परंतु यंदा देशावरील करोना संकटामुळे उत्सव साजरा करण्यात मर्यादा आल्या, तरी मंगलमय वातावरण आणि उत्साह यात कमतरता येऊ न देता साधेपणाने मोठ्या हर्षोल्हासात गणेश उत्सव पार पडला असून लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. तसेच यावेळी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, अशा जयघोषात भक्तिमय वातावरणात आणि जड अंतःकरणाने गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला.

Protected Content