नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती भाजप कार्यालयात साजरी

WhatsApp Image 2020 01 24 at 6.43.20 PM

जळगाव, प्रतिनिधी | भाजप जिल्हा महानगरातर्फे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती दि.२३ जानेवारी रोजी संध्या ५.०० वाजता भाजप कार्यालय येथे साजरी करण्यात आली. नेताजीच्या प्रतिमेचे पूजन राजूमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंतीनिमित्ताने प्रतिमा पूजन प्रसंगी महापौर सिमा भोळे, जिल्हाध्यक्ष महानगर दिपक सूर्यवंशी, जिल्हा संघटन सरचिटणीस विशाल त्रिपाठी, उपगटनेते राजेंद्र घुगे पाटील, जिल्हापदाधिकारी सुभाष शौचे, अजय जोशी, प्रकाश पंडित, शोभा कुळकर्णी, नगरसेवक राजेंद्र मराठे, विक्की राजपूत, केशव नारखेडे, जयेश भावसार, शक्ती महाजन, गणेश माळी, दिपक बाविस्कर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content