पीएम किसान निधी संदर्भात शेतकऱ्यांनी वाचला तहसिलदारांसमोर समस्यांचा पाढा

WhatsApp Image 2020 01 23 at 8.07.26 PM

रावेर, प्रतिनिधी | पीएम किसानचा निधी मिळत नसल्याने काही शेतक-यांनी थेट तहसिल कार्यालय गाठले व तहसिलदार उषाराणी देवगुणे यांच्या समोर येणाऱ्या अडचणी संदर्भात कैफियत मांडली व लवकरात-लवकर तांत्रीक बाबी सोडवीण्याची मागणी केली. यावेळी तहसिलदारांनी देखिल आलेल्या शेतक-यांची समजूत काढून समस्या सोडवीण्याचे आश्वासन दिले.

प्रधामंत्री किसान सम्मान योजना संपूर्ण तहसिल प्रशासन या योजनेवर काम करत असून शेतक-यांना हा निधी देण्यासाठी गाव-पातळीवर तलाठी देखिल परिश्रम घेत आहे. परंतु, काही शेतकरी या योजना संदर्भात तहसिलदार यांच्या दालनात पोहचले व आम्हाला हा निधि मिळत नाही, अनेक चकरा मारल्या परंतु समस्या काही सूटत नसल्याचे त्यांनी सांगितले. अनेक शेतक-यांनी आधार कार्ड, बँक अकाउंटचा नंबर, आयएएफसीच कोड देऊन सुध्दा समस्या सूटत नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा माजी तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, कैलास धनगर, भास्कर पाटील, महेंद्र महाजन, संतोष महाजन, समाधान हिवरे, राजेंद्र पाटील आदी शेतकरी तहसिल कार्यालयात उपस्थित होते.

Protected Content