जिल्हा बँकेच्या भरती परीक्षेचा निकाल जाहीर

0jdcc bank1 467950

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा बँकेतर्फे कर्मचारी भरतीसाठी आयबीपीएसतर्फे घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून आता मुलाखतीनंतर उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे आयबीपीएस या एजन्सीमार्फत २२ सप्टेंबर २०१९ रोजी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. ही परीक्षा दिलेल्या २ हजार ७४३ परीक्षार्थी पैकी गुणवत्ता यादीत आलेल्या ६९५ जणांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यापैकी मुलाखतीतून २२० जणांची निवड करण्यात येणार आहे.
जिल्हा बँकेत ४९० पदे रिक्त आहेत त्यापैकी २२० पदे सरळ सेवेतून भरण्यास सहकार आयुक्तांनी परवानगी देण्यात आली होती. यानुसार ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

Protected Content