गाळेधारकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिरडी आंदोलन ! (व्हिडिओ)

जळगाव राहूल शिरसाळे । शहरातील १६ व्यापारी संकुलातील गाळेधारकांचे विविध मागण्यांसाठी गेल्या १० दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे. आज गाळेधारकांचे तिरडी आंदोलन करण्यात आले. 

 

तिरडी आंदोलनात आज गाळेधारक संघटनेचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांनी आपली भूमिका स्पष्ट करतांना सांगितले की, १६ व्यापारी संकुलातील गाळेधारकांना  गेल्या ९ वर्षापासून प्रयत्न करून द्खील न्याय मिळाला नाही.  शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १५ तारखेपासून गाळेधारक संघटनेतर्फे विविध प्रकारचे आंदोलन करण्यात येत आहेत.  परंतु, मनपा अधिकारी व पदाधिकारी यांनी उपोषण स्थळाला भेट देवून आमच्या व्यथा जाणून घेतल्या नाहीत.   मुंबईहून आ. नाना पटोले यांनी येवून आमच्या व्यथा जाणून घेतल्या मात्र, मनपातील एकही पदाधिकारी यांनी भेट देऊन चर्चा केली नाही. प्रशासन व पदाधिकारी यांनी लक्ष दिले नाही तर आमच्यावर आत्महत्या करण्याशिवाय दूसरा पर्याय राहणार नसल्याने आज आम्ही प्रतिकात्मक  तिरडी यात्रा काढली. याप्रसंगी  तेजस देपुरा, राजेश कोतवाल, बंडूदादा काळे यांच्यासह   चौबे मार्केटमधील व्यापारी  सहभागी झाले होते. यात चौबे मार्केट मधील वसीम काझी मनिष बारी हरिहर खुंटे , अमित गोंड मज्जित खा मस्तान खा, जावेद अख्तर रेहमान, जाकीर भाई, स्वप्निल शिनकर , ललित मराठे, बाबूलाल जैन, योगेश बारी, अमित भागवानी या व्यापाऱ्यांचा समावेश होता.

 

 

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/526196198502160

 

Protected Content